अभिजीत पाटील यांनी लेझीमवर ठेका धरत घेतला आनंद

अभिजीत पाटील यांनी लेझीमवर ठेका धरत घेतला आनंद

अभिजीत पाटील यांचा लेझीम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज :- श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील हे पंढरपूर येथे गणेशोउत्सवानिमित्त अनेक मंडळाच्या पूजा करून भेटी देत आहेत. अनेक मंडळे विविध कलाकृती सादर करत असताना अभिजीत धनंजय पाटील यांनी लेझीम खेळण्याचा आनंद घेत उपस्थितांची मने जिंकली.

कमी कालावधीत कामाच्या जोरावर राज्याच्या राजकारणात एक नवा चेहरा म्हणून अभिजीत धनंजय पाटील यांची ओळख निर्माण झाली आहे.सध्या सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना अभिजीत पाटील यांनी पंढरपुरातील अनेक वर्षांची परंपरा असलेल्या सहकार चौकातील सहकार मंडळातील कार्यकर्त्यांसोबत लेझीमवर ठेका धरला. व्हायरल झालेल्या या व्हिडिओत अभिजीत पाटील हे ढोल-ताशांच्या तालावर सुंदर ठेक्यावर लेझीम खेळले.हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

गेल्या दहा दिवसांपासून सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा झाला .आता गणेश विसर्जनाला सुरूवात झाली असून अभिजीत पाटील यांच्यावतीने पंढरपूर शहरात सर्व गणेश मंडळाचे स्वागत करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे स्टेज टाकण्यात आले आहे. मंगळवारी अनंत चतुर्दशी दिवशी गणपती बाप्पांना निरोप देण्यात येणार आहे. यासाठी पंढरी नगरी सज्ज झाली आहे.

विविध सार्वजनिक मंडळांनी गणपती बाप्पांच्या मिरवणुकी साठी ढोल पथक, लेझीम पथक यासह विविध खेळ, कला पथकाद्वारे सामाजिक संदेश दिला जात आहे. मिरवणुकीत आकर्षक रथ ,विद्युत रोषणाई आणि फुलांची आरास तयार करण्यात येत आहे.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading