कल्याण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त भाळवणी येथे रंगला बैलगाडा शर्यतीचा थरार
भव्य दिव्य जनकल्याण केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन
भाळवणी ता.पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – भाळवणी ता.पंढरपूर येथे बैलगाडा शर्यतीचा थरार रंगला.राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य तथा सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त ओपन बैलगाडा जनकल्याण केसरी मैदानाचे आयोजन राष्ट्रवादीचे युवक प्रदेशचे उपाध्यक्ष समाधान काळे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते.

पंढरपूर तालुक्यात प्रथमच बैलगाडा शर्यतीचे मैदान होत असल्याने हजारो बैलगाडा प्रेमींनी हे मैदान पाहण्यासाठी गर्दी केली होती. या बैलगाडा शर्यतीमध्ये पहिल्याच वर्षी 340 बैलगाड्यांनी सहभाग घेतला.सकाळी 9 वाजलेपासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत बैलगाडी शर्यती झाल्या.विजेत्या बैलगाडी मालकांना लाखो रुपयांची पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी माढा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे,सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याण काळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपक साळुंखे-पाटील, धनश्री परिवाराचे प्रमुख ज्येष्ठ नेते शिवाजी काळुंगे, विठ्ठल परिवारातील नेते माजी चेअरमन भगीरथ भालके,ज्येष्ठ नेते युवराज पाटील, युवा नेते गणेश पाटील,शिवतेजसिंह मोहिते -पाटील, युवा नेते प्रणव परिचारक,सांगोल्याचे युवा नेते बाबासाहेब देशमुख,दिग्विजय पाटील, सहकार शिरोमणी चे व्हाईस चेअरमन भारत कोळेकर,प्रतिभा पतसंस्थेचे चेअरमन विलास काळे,निशिगंधा बँकेचे चेअरमन राजेंद्र जाधव,यशवंत पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष वर्षाराणी शिंदे,शेतकरी संघटनेचे नेते समाधान फाटे,तानाजी बागल, नितीन बागल, शहाजहान शेख, राजाभाऊ जगदाळे,सहकारी शिरोमणी साखर कारखान्याचे आजी-माजी संचालक पदाधिकारी आदींसह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना कल्याण काळे म्हणाले की बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून देशी खिलार वंशाचे पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळणार आहे.पंढरपूर तालुक्या मध्ये प्रथमच आयोजित केलेल्या या मैदानास महाराष्ट्रभरातून आलेल्या बैलगाडी मालकांचा उत्साह पाहून शर्यतीचे मैदान यशस्वी झाले असल्याची भावना व्यक्त केली.
या बैलगाडा मैदानामध्ये सायंकाळी सात वाजता झालेल्या फायनलमध्ये प्रथम क्रमांक विठ्ठल प्रसन्न बुलेट बाजी ग्रुप 41 41 शेंडेचिंच यांच्या सावकार आणि ओम या बैलजोडीने मिळवत जनकल्याण केसरीचा चषक मिळवला.द्वितीय क्रमांक सिद्धनाथ प्रसन्न पार्वती ज्वेलर्स खेड शिवापुर,तृतीय क्रमांक नारायण मोहिते,चतुर्थ क्रमांक मायाक्का प्रसन्न उंबरे दहिगाव,पाचवा क्रमांक राजुशेठ जुगदार कलेढोण सहावा क्रमांक विकास पाटील नेवरे,महावीर शेठ उंबरे यांचा सुदाम एक्सप्रेस,सातवा क्रमांक पै.तुकाराम कानगुडे उंबरे पागे, आठवा क्रमांक विकास पाटील नेवरे महावीर शेठ सुदाम फॅन्स क्लब उंबरे यांनी प्राप्त केला.

विजेत्या सर्व बैलगाडी मालकांना लाखो रुपयांची बक्षिसे व चषक देऊन गौरवण्यात आले.
या मैदानासाठी झेंडा पंच म्हणून पै.पप्पू मंडले,समालोचक संपतराव वाघमोडे,बबलू चाचा, पंच अमोल माने, परमेश्वर लामकाने, दत्तात्रय कोळी, तानाजी अमराळे,लहू भोईटे, अंकुश भुईटे यांनी काम पाहिले.
हे बैलगाडा मैदान यशस्वीपणे पार पडण्यासाठी संयोजन समिती, सहकार शिरोमणीचे सर्व आजी,माजी संचालक व युवा गर्जना संघटना व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
