मणिपूर हिंसाचार :मणिपूरात पुढील पाच दिवस इंटरनेट बंद, शाळा महाविद्यालये 2 दिवस बंद

[ad_1]

social media

राजभवनाकडे कूच करण्याचा प्रयत्न करणारे विद्यार्थी, महिला आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये मंगळवारी चकमक झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. या हाणामारीत 40 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत.

आंदोलक मणिपूर सरकारच्या डीजीपी आणि सुरक्षा सल्लागारांना हटवण्याची मागणी करत आहेत.शेकडो विद्यार्थिनींनी बीटी रोडच्या बाजूने राजभवनाकडे कूच करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना सुरक्षा दलांनी काँग्रेस भवनाजवळ रोखले.

मणिपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनीही निषेध रॅली काढून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुतळ्याचे दहन केले. दरम्यान, सध्याची परिस्थिती पाहता इंफाळ पूर्व आणि पश्चिम जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहेपुढील पाच दिवस संपूर्ण राज्यात इंटरनेट बंद आहे. सर्व खाजगी आणि सरकारी शाळा आणि महाविद्यालयेही पुढील दोन दिवस बंद ठेवण्यात आली आहेत.

 

राज्य सरकारच्या गृह विभागाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, 'मणिपूर राज्यातील सध्याची कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती पाहता, काही असामाजिक तत्वे छायाचित्रे, असभ्य भाषा आणि द्वेषपूर्ण व्हिडिओ संदेश पसरवण्याची शक्यता आहे. लोकांच्या भावना भडकावणे यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाऊ शकतो. आदेशात, संयुक्त सचिव (गृह), मणिपूर सरकार यांनी म्हटले आहे की, मी मणिपूर राज्याच्या प्रादेशिक अधिकारक्षेत्रातील इंटरनेट आणि मोबाइल डेटा सेवा तात्पुरत्या बंद करण्याचा आदेश देतो.

Edited By – Priya Dixit 

 

[ad_2]

Source link


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading