[ad_1]

अमेरिका मधील अटलांटा इंटरनॅशनल एयरपोर्ट वर मंगळवारी दोन विमानांमध्ये समोरासमोर जोरदार टक्कर झाली. यामध्ये डेल्टा एयरबस A350 आणि एंडेवर बॉम्बार्डियर CRJ900 जेट सहभागी आहे. हा अपघात झाला तेव्हा दोन्ही विमान आपल्यापल्या ठिकाणी टॅक्सी-वे वर चालत होते. सुदैवाने या घटनेमध्ये प्रवाशांना दुखापत झाली नाही. व सर्व 271 प्रवाशी सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार डेल्टा फ्लाइट 295 चा पंख एंडेवर एयर फ्लाइट 5526 च्या मागील भागाला धडकला.ज्यामध्ये दोन्ही विमानांना नुकसान झाले आहे. डेल्टाचे एयरबस विमान टोक्योला जाणार होते. तर एंडेवर चे जेट लुइसियाना करिता उड्डाण भरत होते. या भीषण टक्कर नंतर डेल्टा एयरबस A350 आणि एंडेवर बॉम्बार्डियर CRJ900 जेट च्या प्रवाशांना सुरक्षित दुसऱ्या विमानात बसवून पाठवण्यात आले.
[ad_2]
Source link
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
