[ad_1]

सीरियाने आंतरखंडीय चषक फुटबॉल स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघाविरुद्ध चमकदार कामगिरी करत 3-0 असा विजय मिळवत विजेतेपद पटकावले. सीरियासाठी महमूद अल अस्वाद (सातवे), दालेहो इराणदुस्ट (76वे) आणि पाब्लो सबाग (90+6 मिनिटे) यांनी गोल केले. यापूर्वी 3 सप्टेंबर रोजी भारताने मॉरिशसशी गोलशून्य बरोबरी साधली होती,
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून मानोलो मार्केझ यांनी पराभवाची सुरुवात केली आहे. इगोर स्टिमॅक यांची प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर मार्केझने या पदाची धुरा सांभाळली, पण भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक झाली. भारताने 2018 आणि 2023 मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते, तर सीरियाची ही पहिलीच ट्रॉफी आहे. भारतीय भूमीवर सीरियाचा हा पहिलाच विजेतेपद आहे.
Edited By – Priya Dixit
[ad_2]
Source link
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
