नागालॅन्डच्या विकासासाठी महत्वपूर्ण नागामंडईचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते भुमिपुजन

नागालॅन्डच्या विकासासाठी महत्वपूर्ण नागामंडईचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते भुमिपुजन

मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.08 – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते आज नागालँन्डच्या विकासासाठी महत्वाचे पाऊल ठरणा-या नागा मंडई या 10 एकरवर उभ्या राहणा-या कृषी बाजारपेठेचे भुमिपुजन करण्यात आले. चुमौकेडिमा जिल्हयातील सेथेकेमा – ए येथे संपन्न झालेल्या या भुमिपुजन सोहळयास नागालँन्डचे मुख्यमंत्री नेफियु रिओ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

नागा मंडई हा कृषी विभागाच्या सहकार्याने ग्रामीण ॲग्रो फार्म्स लिमीटेड या कंपनीचा उपक्रम आहे.या कंपनीतर्फे नागालॅन्डमध्ये 1 हजार एकरवर शेती करण्यात येत असून या शेतीतील उत्पन्न शेतमाल नागामंडई मध्ये विक्रीस आणला जाणार आहे.या नागा मंडईमुळे नागालॅन्डमधील शेतकरी संपन्न, समृध्द होणार असुन नागालॅन्डमधील कृषी आणि व्यापार क्षेत्रात मोठी प्रगती होणार आहे.पर्यायाने नागालॅन्डचा चांगला विकास होईल,असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.  

नागा मंडईच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी स्पर्धात्मक किमतीत उत्पादनांची विक्री करण्यासाठी एक वाजवी आणि पारदर्शक बाजारपेठ,सुधारित बाजार पेठेतील प्रवेश,कार्यक्षम खरेदी,साठवण आणि वितरणाद्वारे कापणीनंतरचे नुकसान कमी करणे आणि नागालँडमधील आर्थिक विकासाला आधार देणाऱ्या पायाभूत सुविधांचा समावेश होतो.जीडीपी
मंडी मध्ये व्यापाऱ्यांसाठी 110 किरकोळ दुकाने, एकूण 4,000 मेट्रिक टन क्षमतेची 10 गोदामे, पारदर्शक व्यापारासाठी 2 लिलाव यार्ड, प्रत्येकी 500 मेट्रिक टन क्षमतेचे 2 कोल्ड स्टोरेज युनिट आणि दोन्ही वातानुकूलित किसान भवन असतील अशी माहिती ना.रामदास आठवले यांनी दिली.

यावेळी नागालॅन्डचे रिपब्लिकन पक्षाचे राज्य अध्यक्ष मुगाथोआए,रिपाइंचे ईशान्य भारत प्रभारी विनोद निकाळजे, रिपब्लिकन पक्षाचे आमदार लिमाअनयन चाँग,आमदार मथंग यानथन,आमदार ए.आर.ज्वेगा,घनश्याम चिरणकर,सलीम, जी.के.रमा उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन अभिजीत साहु, सांगर संगवई आणि चेतना गांगर यांनी केले होते.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading