[ad_1]

राज्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर कोसळलेल्या पुतळ्याच्या जागी परत आता छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा बसवण्यात येणार असल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावरील महाराजांचा पुतळा कोसळला होता.
मिळालेल्या माहितीनुसार विरोधकांनी या घटनेवर जोरदार टीका करत महाराष्ट्राच्या अभिमानाला धक्का पोहोचल्याचा दावा केला होता. तसेच शिंदे म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज हे 'युगपुरुष' आहे. तसेच ते राज्य आणि राष्ट्राची शान आहेत. राजकोट किल्ल्यावर घडलेली घटना दुर्दैवी आहे. महाराष्ट्र सरकार आणि नौदलातर्फे लवकरच तेथे पुन्हा भव्य पुतळा बसवला जाईल.”
Edited By- Dhanashri Naik
[ad_2]
Source link
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
