[ad_1]

छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा मालवण मध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एका ट्रक मधून आणला. तसेच पोलिसांनी मालवण राजकोट किल्ल्यावर कडक बंदोबस्त ठेवल्याची माहिती समोर आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रात राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप आणि शिवसेना युबीटी हे एकमेकांवर वादग्रस्त टीकास्त्र सोडतांना दिसत आहे. तर मालवणमधील राजकोट किल्ल्यावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर आता ट्रक मधून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा घेऊन छत्रपती संभाजी नगर येथील धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान या संघटनेचे कार्यकर्ते मालवणमध्ये बुधवारी रात्री दाखल झाले. तसेच ते म्हणाले की, महाराजांचा हा पुतळा चौथर्यावर बसविण्यात येईल. पण मालवण पोलिसांनी त्यांना अडवले व परवानगीशिवाय तुम्ही महाराजांचा हा नवीन पुतळा स्थापित करू शकत नाही असे सांगून पोलिसांनी त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेले.
तसेच मिळालेल्या माहितीनुसार महाराजांचा हा पुतळा धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान संस्थेमार्फत आणण्यात आला होता. पोलिसांनी ट्रक पोलीस स्टेशनमध्ये थांबवून कार्यकर्त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
[ad_2]
Source link
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
