बदलापुर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे आंदोलन..

बदलापुर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे आंदोलन..

हातात निषेधाचे बोर्ड घेवुन काळ्या पट्ट्या बांधत घोषणाबाजी..

गादेगाव ता.पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि. २४/०८/२०२४ – गादेगाव ता.पंढरपूर येथे महाविकास आघाडीचे पदाधिकाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनी आज येथील मेन रोडवर बदलापुर घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.

यावेळेस बोलताना शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सडेतोड वक्ते रणजित बागल बोलताना म्हणाले की, बदलापुर येथे घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असुन याबाबत तात्काळ आरोपीला फाशीची शिक्षा देवुन अशा विध्वंसक व दुष्कृत्य करणाऱ्या प्रवृत्तींना धडा शिकवणे गरजेचे आहे.राज्याचे गृहमंत्री सभा व कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहेत.महाराष्ट्राला निष्क्रिय व स्वार्थी गृहमंत्री मिळाला आहे.महाराष्ट्रातील लेकी बाळी जर सुरक्षित नसतील तर त्यांना लाडक्या बनवण्याच्या योजना देखील फसव्या योजनाच आहेत असे म्हणावे लागेल असे म्हणाले.

संभाजी ब्रिगेड चे तालुकाप्रमुख बाळासाहेब बागल म्हणाले की,महाराष्ट्र हा शाहु फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे,मात्र अशा घटनांमुळे महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण गढूळ बनले आहे.आरोपीने हे नराधम कृत करत माणुसकीला काळिमा फासला आहे,अशा आरोपीला खरंतर एन्काऊंटर करून मारले पाहिजे मात्र सरकार यावर कोणतेही कडक पावले उचलायला तयार नाही. सरकारच्या या निष्क्रियपणाचा व घटनेचा निषेध करण्यासाठी आज हे आंदोलन करण्यात येत आहे.

यावेळी शिवसेनेचे रणजित बागल, संभाजी ब्रिगेडचे तालुका प्रमुख बाळासाहेब बागल, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे डाॅ रमेश फाटे,भगवान महाराज बागल,हणमंत बागल,विजय बागल,रामदास गिड्डे,संजय कदम,आकाश मांडवे,शंकर कांबळे,शांतिनाथ बाबर,सरकार पाटील,दिपक पाटील,सुरेश बागल,शांतिनाथ बागल यांचेसह नागरिक उपस्थित होते.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading