[ad_1]

देशातील अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कधी मध्यम तर कधी मुसळधार पाऊस कोसळत आहे. काही राज्यांमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. हवामान विभागाने महाराष्ट्र, नागालँड, मणिपुर, मिजोरम, त्रिपुरा, आसाम, गोवा, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगढ आणि राजस्थान मध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
तसेच राजधानी दिल्लीमध्ये देखील पावसाचा कहर सुरु आहे. हवामान विभागाने 23 ऑगस्टला दिल्लीमध्ये हलका मध्यमस्वरूपच्या पावसाचा इशारा दिला आहे.
तसेच येत्या 24 तासांमध्ये मणिपुर, मिजोरम, त्रिपुरा, सिक्किम, पश्चिमी आसाम, पश्चिम बंगाल आणि झारखंडच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस तर छत्तीसगढ, ओडिसा, मध्य प्रदेश, तेलंगणा, विदर्भ, उत्तर आंध्र प्रदेश, राजस्थान, कोंकण, गोवा आणि लक्षद्वीप मध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तसेच याशिवाय पूर्वोत्तर भारत, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, गुजरात, मराठवाड़ा, तटीय कर्नाटक, केरळ, अंदमान-निकोबार द्वीप आणि तेलंगणा मध्ये मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. जम्मू कश्मीर, पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, सौराष्ट्र आणि कच्छ, रायलसीमा, आंतरिक कर्नाटक आणि तामिळनाडू मध्ये हलका पावसाचा असर आहे.
Edited By- Dhanashri Naik
[ad_2]
Source link
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
