[ad_1]

काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते आणि राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी मंगळवारी माहिती दिली की त्यांचा कोविड-19 चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दिग्विजय यांनी त्यांच्या सोशल मीडिया एक्स हँडलवर याबाबत अपडेट जारी केले असून काही दिवस ते कुणालाही भेटू शकणार नसल्याचे सांगितले आहे.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते म्हणाले, माझी कोव्हीड चाचणी अहवाल सकारात्मक आला डॉक्टरांनी मला 5 दिवसांची विश्रांती घेण्यास सांगितले आहे.त्यामुळे मी कोणाला भेटू शकणार नाही. क्षमस्व! तुम्ही स्वतःची काळजी घ्या.
राज्यात सततच्या हवामानातील चढउतारामुळे रोगराई वाढू लागली आहे. एकीकडे डेंग्यू आणि मलेरियाचा प्रादुर्भाव वाढत आहे, तर दुसरीकडे व्हायरल फिव्हर आणि आता कोरोनाचेही रुग्ण आढळून येत आहेत.
माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह 19 ऑगस्टला रक्षाबंधनाच्या दिवशी सागर जिल्ह्यातील खुराईच्या बडोदिया नोनागीर गावात पोहोचले होते. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांची चाचणी घेण्यासही त्यांनी सांगितले आहे.
Edited by – Priya Dixit
[ad_2]
Source link
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
