मनसे नेते आणि पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे उमेदवार दिलीप धोत्रे यांची विविध कार्यक्रमांना उपस्थिती

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर शहर तालुक्यातील सकल मुस्लिम समाज सोशल ग्रुप च्यावतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय एकात्मता तिरंगा रॅली पंढरपूर शहरातुन काढण्यात आली होती.


यावेळी समस्त मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने मनसे नेते दिलीप धोत्रे यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी मुस्लिम समाजाचे नेते ॲड यासिन शेख, समाजसेवक बशीर शेख,आरिफ बेळगांवकर,बाळासाहेब शेख,गौस धारूरकर आदींसह समाज बांधव उपस्थित होते.

तसेच श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त टेंभुर्णी येथे आयोजित कुस्ती स्पर्धेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा मतदार संघांचे अधिकृत उमेदवार व मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.



Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
