स्वातंत्र्यदिनी माणदेशी कडून अहिंसा पतसंस्थेचा सन्मान
म्हसवड/ ज्ञानप्रवाह न्यूज – महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी व सेवाभावी कार्याबद्दल नुकतेच हैद्राबाद येथे अहिंसा पतसंस्थेस दिपस्तंभ पुरस्काराने गौरविण्यात आले.
हा पुरस्कार कॉसमॉस बँकेचे चेअरमन मिलिंद काळे यांचे हस्ते देण्यात आला होता.अहिंसा पतसंस्थेस दिपस्तंभ पुरस्कार मिळाल्याबद्दल स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून माणदेशी महिला बँक व माणदेशी फाउंडेशन च्यावतीने अध्यक्षा सौ चेतना सिन्हा यांचे हस्ते अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष नितिन दोशी यांचा सत्कार माणदेशी बँकेच्या प्रांगणात घेण्यात आला.
यावेळी माणदेशी महिला बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.रेखा कुलकर्णी, संचालिका राजश्री दोशी,सौ राणी बनगर, सौ.अनघा कामत – सिन्हा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माण खटाव चे अध्यक्ष आप्पासाहेब पुकळे, सौ वनिता पिसे, सौ कोरे मॅडम,जवाहर देशमाने,अहिंसा पतसंथेचे संचालक विजय बनगर व बँकेचे सभासद, बँकेचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
