सुस्ते येथे खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न
गप्पा, गाणी, प्रश्नमंजुषा सह हळदी-कुंकू कार्यक्रमातून अभिजीत पाटीलांची विधानसभेची जोरदार तयारी

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१६ऑगस्ट : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत धनंजय पाटील यांच्या संकल्पनेतून विठ्ठल प्रतिष्ठान यांच्यावतीने नागपंचमी व रक्षाबंधनानिमित्त निवेदिका मोनिका जाजू यांच्या निवेदनात खेळ पैठणीचा कार्यक्रम सुस्ते येथे उत्साहात संपन्न झाला.

दैनंदिन जीवनात व्यस्त असलेल्या महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा हेतुने कार्यक्रम घेत आहे. महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांनाही आनंदाचे क्षण वेचता यावेत याच अनुषंगाने खेळ पैठणीचा कार्यक्रम घेत असल्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले.

या कार्यक्रमामध्ये विजयी झालेल्या महिलांचे हार्दिक अभिनंदन करून त्यांना पारितोषिकांचे वाटप करण्यात आले.
यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक रामदास चव्हाण, पांडुरंग कदम,बाळासाहेब सालविठ्ठल,अनिल घाडगे, सरपंच विशाल कसबे, दिलीप रणदिवे, समाधान चव्हाण, उपसरपंच स्नेहा बोबडे, ग्रामपंचायत सदस्य राणी चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य मनीषा कोळी, ग्रामपंचायत सदस्य विष्णू तात्या गावडे, राजेंद्र बोबडे, विठ्ठल कारखान्याचे संचालक विठ्ठल रणदिवे,परमेश्वर कांबळे,अजित मुलाणी, शरद लोकरे, अंनता चव्हाण, कुमार वाघमोडे, अर्चना चव्हाण,

सारिका चव्हाण तसेच या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतलेले डीव्हीपी पीपल बँकेचे संचालक अनिल यादव, तानाजी सालविठ्ठल, शंकर सुर्वे, तुषार बोबडे, नितीन गावडे, महेश सालविठ्ठल, संतोष साठे, पंकज चव्हाण, बालाजी फुगारे, विशाल फरतडे, श्रीनिवास चव्हाण, अविनाश नागटिळक आदीसह मान्यवर उपस्थित होते.

Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
