[ad_1]

तमिलनाडुच्या तिरुवल्लूर मध्ये चेन्नई-तिरुपति नॅशनल हायवेवर भीषण अपघात झाला आहे. यामध्ये पाच विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. हायवेवर जलद गतीने जाणारी एक लॉरी आणि कार मध्ये भीषण समोरासमोर धडक झाल्याने यामध्ये पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे. तर दोन जखमी झालेले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
केके चत्रम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे विद्यार्थी खाजगी महाविद्यालयाचे विद्यार्थी आहे. हे सर्व एका कारमध्ये प्रवास करीत होते. या दरम्यान हा अपघात घडल्याचे समजले आहे.
पोलिसांनी सांगितले की मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमसाठी पाठवण्यात आले आहे. तसेच पुढील चौकशी सुरु आहे.
[ad_2]
Source link
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
