[ad_1]

नवी मुंबई टाऊनशिप परिसरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 5 बांग्लादेशींना पोलिसांनी अटक केली आहे. नवी मुंबईच्या मानवी तस्करी प्रतिबंधक कक्षाने कोपरखैरणे परिसरात एका इमारतीवर धाड टाकून 5 जणांना अटक केली असून त्यात चार महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. पोलिसांना हे बंगलादेशी बेकायदेशीरपणे राहत असल्याची माहिती मिळाल्यावर त्यांनी कारवाई केली.
हे घुसखोर बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात शिरले. या महिला जवळच्या घरातच घरकामाला होत्या. तर पुरुष रंगदारीचे काम करत होते. पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांच्याविरुद्द्ध आयपीसीच्या कलमांनुसार फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तसेच पासपोर्ट कायदा- 1950 आणि परदेशी कायदा -1946 च्या तरतुदीनुसार, गुन्हा दाखल केला आहे.
एका एजन्सीने दिलेल्या घुसखोरी प्रकरणाची माहितीनुसार, कोपरखैरणे पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, घुसखोर बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात शिरले.अटक केलेल्या महिलांचे वय 34 ते 45 वर्षे आहे. पोलीस प्रकरणाचा पुढील शोध लावत आहे.
Edited by – Priya Dixit
[ad_2]
Source link
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
