कलम 370 हटवल्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये उद्योग आणि रोजगार वाढत आहे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

कलम 370 हटवल्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये उद्योग आणि रोजगार वाढत आहे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी घेतली भेट

श्रीनगर, दि.१० – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज जम्मू-कश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांची सदिच्छा भेट घेतली .या भेटीत उभय नेत्यांनी जम्मू-काश्मीरच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक आणि राजकीय घडामोडींवर चर्चा केली .केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे विविध योजनांद्वारे जम्मू काश्मीरमधील जनतेचा विकास घडविण्याबाबत यावेळी ना.रामदास आठवले यांनी चर्चा केली.

जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 उठविल्यामुळे या भागात गुंतवणूक वाढत असून उद्योगधंदे उभारले जात आहेत उद्योग व्यापार जम्मू- काश्मीरमध्ये चांगल्या प्रमाणात वाढत असल्यामुळे दर महिन्याला येथील बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी आम्ही नोकर भरती करीत आहोत अशी माहिती जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना दिली.

जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा,केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

जम्मू काश्मीरमध्ये आता पूर्ण शांतता आहे लोकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. जम्मू-काश्मीरमध्ये उद्योग व्यवसाय वाढत असल्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळत आहे . त्यामुळे लोकांनी आनंदाने समाधान व्यक्त केले आहे अशी माहिती नामदार रामदास आठवले यांनी दिली .
जम्मू काश्मीरच्या 20 जिल्ह्यांपैकी 16 जिल्ह्यांमध्ये ओल्ड एज होम आहेत. उरलेल्या चार जिल्ह्यांमध्ये लवकरच ओल्ड एज होम केंद्र सरकारच्या समाज कल्याण विभागातर्फे सुरू करण्यात येतील असे आश्वासन ना.रामदास आठवले यांनी दिले .जम्मू कश्मीरच्या दौऱ्यावर आले असता नामदार रामदास आठवले यांनी श्रीनगर येथे सामाजिक न्याय विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीत जम्मू काश्मीरमधील दिव्यांग जन ज्येष्ठ नागरिक अनुसूचित जाती ओबीसी यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार तर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा आढावा घेतला .यावेळी ट्रान्सजेंडर आणि दिव्यांग जणांच्या कल्याणासाठी विविध योजनांचा लाभ या सर्व समाज घटकांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश ना. रामदास आठवले यांनी अधिकारी वर्गाला दिले.केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागातर्फे लवकरच जम्मू-काश्मीरमधील दृष्टीहीन कर्णबधिर या दिव्यांगांसाठी विद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल सरकार आणि सामाजिक संस्थेच्या वतीने जम्मू- काश्मीर मध्ये दिव्यांग जनांसाठी विद्यालय उभारण्यात येईल असे आश्वासन ना.रामदास आठवले यांनी दिले.

काश्मीरमध्ये एकूण 90 जागा या विधानसभा निवडणुकीसाठी निश्चित करण्यात येणार आहेत त्यासाठी निवडणूक आयोग चे एक पथक जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आले असून जम्मू-कश्मीरच्या विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी करीत आहे जम्मू काश्मीरला लवकरच राज्याचा दर्जा देण्याबाबतचा निर्णय होणार आहे .महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसोबतच जम्मू काश्मीरच्या ही विधानसभा निवडणुका या वर्षाखेरीस होतील असा आपला अंदाज असल्याचे ना.रामदास आठवले यांनी सांगितले.
जम्मू काश्मीरच्या दौऱ्यात श्रीनगर येथे पोलो ग्राउंड वर पहिल्यांदाच सुरू करण्यात आलेल्या काश्मीर हॉकी टूर्नामेंटचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading