सोलापूर शहर जिल्ह्यातील ०९ विधानसभा मतदार संघातून काँग्रेस पक्षाकडे एकूण ६२ इच्छुकांचे उमेदवारी मागणी अर्ज दाखल

सोलापूर शहर व जिल्ह्यातील ०९ विधानसभा मतदार संघातून काँग्रेस पक्षाकडे एकूण ६२ इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी मागणीचे अर्ज केले दाखल

शहराध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष अँड नंदकुमार पवार यांची माहिती

सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१० ऑगस्ट २०२४- राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सप्टेंबर – ऑक्टोंबर २०२४ मध्ये होत आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शाखाली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागविण्याची प्रक्रियेची आज दि.१० ऑगस्ट ही शेवटची तारीख होती. आजपर्यंत सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व ११ विधानसभा मतदारसंघ पैकी ०९ विधान सभा मतदारसंघातून एकूण ६२ इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज शहर अध्यक्ष चेतन नरोटे व जिल्हा कार्याध्यक्ष अँड नंदकुमार पवार यांच्याकडे दाखल केले आहेत.

विधानसभा मतदारसंघनिहाय इच्छुक उमेदवार

२४८ – सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून प्रकाश वाले, उदय शंकर चाकोते, सुदीप चाकोते, सुनील रसाळे, सुशील बंदपट्टे, राजन कामत, सातलिंग शटगार या ०७ जणांनी उमेदवारी मागितली आहे.

२४९- सोलापूर मध्य विधानसभा मतदार संघातून चेतन नरोटे, संजय हेमगड्डी, अरिफ शेख, रियाज हुंडेकरी, फिरदोस पटेल, देवेंद्र भंडारे, अंबादास बाबा करगुळे, जुबेर कुरेशी, शकील मौलवी,शौकत पठाण,रुस्तम कंपली, हसीब नदाफ, मैनुद्दीन शेख, महिबुब (M.D.) शेख,असिफ इकबाल,रियाज सय्यद, सुधाकर बनसोडे, राहुल ओव्हाळे या १८ जणांनी उमेदवारी मागितली आहे.

२५१- दक्षिण विधानसभा मतदारसंघासातून दिलीप माने, सुरेश हसापुरे,बाबा मिस्त्री, बाळासाहेब शेळके, महादेव कोगनुरे, अशोक देवकते, सुभाष चव्हाण, हरीश पाटील, सुदीप चाकोते, फिरदोस पटेल, जाफरताज पटेल,शालिवाहन माने देशमुख,भोजराज पवार, विजयकुमार हतुरे, प्रशांत कांबळे, रफिक काझी, चिदानंद सुंटे, रजाक मुजावर, रुकय्याबानू बिराजदार ,रमेश हसापुरे या २० जणांनी उमेदवारी मागितली आहे.

२५० अक्कलकोट विधानसभा मतदार संघातून सोलापूर जिल्हा काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी केलेले इच्छुक उमेदवार-सिद्धाराम सातलिंगप्पा म्हेत्रे,मल्लिकार्जुन महादेव पाटील,भीमाशंकर नागप्‍पा जमादार, सौ.पूजा राहुल पाटील (चिक्केहळ्ळी )

२४७ मोहोळ विधानसभा मतदारसंघातून सोलापूर जिल्हा काँग्रेस कडे उमेदवारीची मागणी केलेले इच्छुक उमेदवार – अँड.गजेंद्र गौतम खरात,किशोर नेताजी पवार,प्रशांत पुंडलिक साळे,किशोरकुमार रघुनाथ सरदेसाई

२४५ माढा विधानसभा मतदारसंघातून सोलापूर जिल्हा काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी केलेले इच्छुक उमेदवार – सौ मीनलताई गणपतराव साठे,प्रा.संदीप वसंतराव साठे

२५२ पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातून सोलापूर जिल्हा काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी केलेले इच्छुक उमेदवार -आदित्य चंद्रकलेश्वर फत्तेपूरकर, अमोल राजेंद्र म्हमाणे, अँड.राविकिरण सुरेश कोळेकर,राजेश सिताराम लिगाडे (प्रदेश)

२४६ बार्शी विधानसभा मतदारसंघातून सोलापूर जिल्हा काँग्रेस कडे उमेदवारीची मागणी केलेले इच्छुक उमेदवार – अँड. इस्माईल तांबोळी,विजय बाळकृष्ण साळुंके   (प्रदेश)

२५४ माळशिरस विधानसभा मतदारसंघातून सोलापूर जिल्हा काँग्रेस कडे उमेदवारीची मागणी केलेले इच्छुक उमेदवार
१) प्रशांत पुंडलिक साळे

असे इच्छुक उमेदवारांनी सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कार्यालयाकडे उमेदवारी अर्ज दाखल करून उमेदवारीची मागणी केली आहे.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading