कॉलवरून आर्थिक फसवणुकीचा धोका तुम्ही टाळू शकता त्यासाठी लक्षात ठेवा 160 नंबर – ॲड.चैतन्य भंडारी
धुळे/पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज – सायबर भामटे विविध नंबरवरून तुम्हाला मेसेज अथवा कॉल करून नंतर तुम्हाला जणू हिप्नोटाईज करून सापळ्यात अडकवतात आणि लाखो रुपये तुम्हाला टोपी घालतात.
अशी आर्थिक फसवणूक ऑनलाईनच होते आणि त्याची सुरुवात त्या भामट्याकडून कॉल ,मेसेज करून होते. जर त्या पहिल्याच स्टेजला तुम्हाला कळलं की हा फ्रॉड कॉल आहे तर तुम्ही आधीच सावध होऊ शकता आणि पुढील धोका टाळू शकता.

त्यासाठी आता सरकारने देशपातळीवर 160 हा कोड क्रमांक सर्व अधिकृत आर्थिक संस्थांसाठी लागू केला आहे. जसा आपल्या देशाचा कोड +91 आहे तसा आता आर्थिक संस्थांसाठी सुरुवातीचा 160 हा कोड असेल. आर्थिक संस्थांमध्ये बॅंका, स्टॉक एक्स्चेंज, दूरसंचार विभाग,मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्या अशा सर्वासाठी तो लागू असेल. म्हणजेच आता यापुढे यापैकी कुणाकडून तुम्हाला संपर्क करण्यात येत असेल तर त्यांच्या नंबर आधी तुम्ही 160 जर पाहिले तर समजून जा की येणारा कॉल / मेसेज हा अधिकृत आहे.
अशा अधिकृत संस्थांचा नंबर साधारण असा असेल 160 0ABC xxxx हे लक्षात ठेवा. यातील AB म्हणजे टेलिकॉम कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणारी अक्षरे असून C म्हणजे त्यांच्या टेलिकॉम ऑपरेटरचा कोड आहे. इतकं किचकट लक्षात राहात तरी किमान 160 हा आकडा तरी नक्की लक्षात ठेवा आणि फसवणुकीच्या जाळ्यात अडकण्या पासून स्वतःला वाचवा असे आवाहन सायबर तज्ञ ॲड.चैतन्य भंडारी व डॉ.धनंजय देशपांडे,पुणे यांनी केले आहे.
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
