छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त
विधान भवनात आदरांजली
मुंबई/ ज्ञानप्रवाह न्यूज,दिनांक 03 एप्रिल : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज बुधवार, दिनांक 03 एप्रिल, 2024 रोजी विधान भवनातील त्यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ.श्रीमती नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.

याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (1) (कार्यभार) जितेंद्र भोळे व सचिव (2) (कार्यभार) डॉ.विलास आठवले, उप सचिव राजेश तारवी, श्रीमती पूनम ढगे, अवर सचिव विजय कोमटवार, मोहन काकड, अवर सचिव (समिती) सुरेश मोगल,उप सभापती यांचे खाजगी सचिव तथा जनसंपर्क अधिकारी रविंद्र खेबुडकर, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी, म.वि.स. निलेश मदाने, विधानमंडळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी प्रदिप चव्हाण यांच्यासह विधानमंडळ सचिवालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळयास पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
