[ad_1]

पालघर जिल्ह्यात मुंबई-अहमदाबाद महामार्गावर शनिवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास हायड्रोजन गॅस सिलिंडर घेऊन जाणारा ट्रक उलटून अपघात झाला त्यात ट्रकने पेट घेतल्याने गोंधळ उडाला. या अपघातात सिलिंडर रस्त्यावर पडले आणि काहींचा स्फोट झाला.
अपघाताची माहिती अग्निशमन दलाला मिळाल्यावर घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या मध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही. काही काळ या महामार्गावर वाहतूक कोंडी झाली.
हा ट्रक गुजरातकडून मुंबईकडे जात असताना वसई ते तुंगारेश्वर फाट्या दरम्यान अनियंत्रित होऊन उलटला आणि ट्रकने पेट घेतला. या मध्ये हायड्रोजनगॅसचे सिलिंडर होते काही सिलेंडरचा स्फोट झाला.
अपघाताची माहिती काही लोकांनी अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले.रस्त्यावर पडलेले सिलिंडर क्रेनच्या साहाय्याने बाजूला करण्यात आले आणि वाहतूक सुरळीत केली.
Edited By- Priya Dixit
[ad_2]
Source link
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
