महायुती सरकारला महिला करणार बांगडी चोळीचा आहेर

महायुती सरकारला महिला करणार बांगडी चोळीचा आहेर

उरण व शिळफाटा येथे महिलांवर झालेल्या अन्याय व अत्याचाराविरुद्ध आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पंढरपूर यांच्याकडून महाराष्ट्र सरकार आणि गृहमंत्री व सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला

गृहमंत्र्यांना बांगडी चोळीचा आहेर करण्याचा निर्धार यावेळी महिलांनी व्यक्त केला

महिलांना सुरक्षा मिळावी महिलांच्या सुरक्षित वाढ व्हावी गुन्हेगारांना तात्काळ फाशी मिळावी या संदर्भात आज पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पंढरपूर यांच्यावतीने महायुती सरकारचा निषेध करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पंढरपूर तालुकाध्यक्ष संदीप मांडवे,महिला तालुकाध्यक्षा राजश्रीताई ताड, शहराध्यक्षा सुनंदा उमाटे, सोमनाथ गोरे, दत्तात्रेय माने, नवनाथ मोरे, मनीष पवार, अमोल खिलारे, संजय शिंदे, विजय गायकवाड, अभिजीत कवडे यांच्यासह अनेक महिला भगिनीं आणि कार्यकर्तेंनी महाराष्ट्रातल्या या काम चुकार व कुचकामी सरकारचा निषेध केला.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading