[ad_1]

मुंबईतील जोगेश्वरी भागातून एका तरुणीवर अनेकदा बलात्कार करून तिला गर्भपात करण्यास भाग पाडल्या प्रकरणी 28 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. ठाणे पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
आरोपीने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर फेब्रुवारी 2022 ते जानेवारी 2024 पर्यंत तिच्यावर अनेकदा बलात्कार केला. ती गर्भवती झाल्यावर तिला गर्भपात करण्यासाठी बाध्य केले.
आरोपीने तरुणीशी लग्न करण्यासाठी नकार दिला त्यानंतर तिने तक्रार दाखल केली. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.
ठाणे जिल्हा पोलीस अधिकाऱ्याने या प्रकरणाबाबत सांगितले की, आरोपीने पीडितेवर अनेकदा बलात्कार केला. यानंतर तिला गर्भपात करण्यास भाग पाडण्यात आले. या प्रकरणात आरोपीला मुंबईतील जोगेश्वरी येथून अटक करण्यात आली असून पोलीस पथक चौकशी करत आहे. आरोपीवर संबंधित कलमांतर्गत कारवाई करण्यात येत आहे.
Edited by – Priya Dixit
[ad_2]
Source link
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
