विधानपरिषद नवनिर्वाचित आमदारांचा २८ जुलै रोजी शपथविधी
उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे नवनिर्वाचित सदस्यांना देणार शपथ
मुंबई – नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा २८ जुलै रोजी शपथविधी आहे.

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान पार पडले.यावेळी निवडून आलेल्या सर्व सदस्यांना उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडून शपथ दिली जाणार आहे.
यामध्ये योगेश टिळेकर,श्रीमती पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे ,सदाभाऊ खोत ,श्रीमती भावना गवळी,कृपाल तुमाने,राजेश विटेकर,शिवाजीराव गर्जे,मिलिंद नार्वेकर, श्रीमती प्रज्ञा सातव या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी पार पडणार आहे.
विधानभवनातील सेंट्रल हॉल मध्ये रविवार दि.२८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे.
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
