पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस; दोन वेगळ्या घटनांमध्ये 4 जणांचा मृत्यू

[ad_1]

heavy rain
बुधवारी रात्री (24 जुलै) पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक गावांना रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.

 

हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर आणि पुणे शहरातील शाळा 25 जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

 

तर सध्या खडकवासला धरणातून 40 हजार क्यूसेक विसर्ग सुरू होत आहे. त्यामुळे पुणे शहरातील सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे.

 

त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दिवसे यांनी केले आहे.

 

या पावसामुळे जिल्ह्यातील विविध धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

 

पुणे शहरातील विविध भागांमध्ये पावसामुळे आणि खडकवासला धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे पाणी शिरले आहे.

 

मुळा मुठा नद्यांना त्यामुळे पूर आला आहे. इथला भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे. शहरात काही ठिकाणी वृक्ष कोसळण्याच्या घटना घडल्या.

 

पुढच्या काही तासांमध्ये असाच मुसळधार पाऊस सुरू राहणार असून नागरिकांनी बाहेर जाणे टाळावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

 

मुसळधार पावसामुळे शहरासह जिल्ह्यातील शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

 

ताम्हिणी परिसरात डोंगरकडा कोसळल्याने एकजण मृत्युमुखी पडला आहे.

 

तर पुणे शहरात विजेचा शॅाक बसल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

 

हवामान विभागाकडून या भागांसाठी अलर्ट

पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागांना काल रेड अलर्ट घोषित करण्यात आला होता. तर शुक्रवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

 

कोल्हापूर आणि साताऱ्याच्या घाट भागांत जोरदगार पाऊस आणि पठारी भागांत मध्यम पाऊस आहे.

 

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार रायगड आणि ठाणे परिसरात पुढच्या तीन ते चार तासांमध्ये जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

 

मुंबईमध्ये देखील वेगवान वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

तसंच 50-60 kmph वाऱ्यासह पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाच्या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुण्यासह सातारा आणि कोल्हापूरमध्ये देखील घाट परिसरासह काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वक्तवण्यात आली आहे.

 

सोलापूर, लातूर धाराशीव, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर जालना, बीड आणि सांगलीमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

 

हवामान तज्ज्ञ विनीत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे शहरामध्ये 11 वाजेपर्यंत मुसळधार पाऊस सुरू राहील तर लोणावळा, लवासा, ताम्हिणी मुळशी या परिसरामध्ये दुपारपर्यंत मुसळधार पाऊस चालू राहील.

 

पुणे जिल्ह्यातील परिस्थिती आणि पाऊस

पुणे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या आकडेवारी नुसार जुन्नर मध्ये 214 मिमी, लवासा मध्ये 418 मिमी तर लोणावण्यात 299.5 मिमी पाऊस झाला आहे.

 

तर पुणे शहरातील वडगाव शेरी, चिंचवड एनडीए परिसरासह तळेगाव आणि आंबेगाव मध्ये 100 मिमी हून अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे.

 

खडकवासला धरणातून रात्रीपासून 35 हजार क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरण परिसरात 11 मिमी तर घाटमाथ्यावर 200 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला आहे.

 

त्यानुसार शहरातील भिडे पुल पाण्याखाली गेला असून सिंहगड रस्त्यावरील नदीकाठच्या द्वारका, एकता अशा सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे. तर हिंगणे परिसरात साईनगर इथं डोंगर माथ्यावरुन मोठ्या प्रमाणावर पाणी येत आहे.

 

ताम्हिणी जवळील आदरवाडी गाव परिसरात डोंगरकडा तुटल्याने एक जणाचा मृत्यू तर आणखी एकजण जखमी झाला आहे.

 

विजेचा शॉक लागून तिघांचा मृत्यू

पुणे शहरातील झेड ब्रीज परिसरातील अंडा भुर्जी स्टॅाल मध्ये काम करणारे तीन जण स्टॅाल बंद करुन सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी गेले होते.

 

यावेळी विजेचा शॅाक लागल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. अभिषेक घाणेकर, आकाश माने आणि शिवा परिहार अशी तिघांची नावे आहेत.

 

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार शहरात झाडपडीच्या 45 घटनांची नोंद करण्यात आली आहे. तर 2 घरपडीच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे. शहराच्या विविध भागांमधील 6 सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे.

 

[ad_2]

Source link


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading