युमॅनीटी फाउंडेशनने राबविले मोफत आरोग्य शिबीर

युमॅनीटी फाउंडेशनने राबविले मोफत आरोग्य शिबीर

धुळे / ज्ञानप्रवाह न्यूज – युमॅनिटी फाउंडेशन तर्फे जुन्नेर ता.जि.धुळे ग्रामस्थांसाठी ॲड. मोहन भंडारी धुळे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

या आरोग्य शिबीरात धुळयातील डॉ.सुशिल नवसारे,डॉ.संजय सिंघवी,डॉ.हर्षराज संचेती आणि युनिटी फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

यावेळी तज्ञ डॉक्टरांनी जुन्नेर गावातील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करुन त्यांच्या आजारावर मोफत औषधांचे वाटप करण्यात आले व त्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन देखील केले.यावेळी सर्व डॉक्टर्स टीमचा सत्कार युनिटी फाउंडेशनतर्फे करण्यात आला. या कार्यक्रमात उपस्थित सर्व डॉक्टरांनी युनिटी फाउंडेशनच्या या कार्याबद्दल गौरवोद्‌गार काढले व सर्वांनी असे आरोग्यविषयक उपक्रम समाजासाठी राबवावे असे आवाहन केले.

याप्रसंगी युनिटी फाउंडेशनचे प्रमुख वैशाली काळे,कल्याणी भंडारी,ॲड.चैतन्य भंडारी, प्रीत बरन,पुष्पेश श्रीखंडे,चार्मिश भंडारी, रियाज मास्टर,नितीन चौधरी,नाना हालोर,भक्ती शहा, धवल शहा,प्रेम सूर्यवंशी,विनोद पाटील यांचा सक्रीय सहभाग होता. या कार्यक्रमात जुन्नेर गावचे सरपंच भुषण मराठे, बापूसाहेब सुधाकर राउळ व आप्पा भगवान कुवर आणि जुन्नेर ग्रामस्थ उपस्थित होते.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading