आगामी जिल्हापरिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पंढरपूर तालुका दौरा
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि १०/०५/०२५- आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ,जिल्हाप्रमुख पंढरपूर विभाग संभाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाप्रमुख काकासाहेब बुराडे,तालुका प्रमुख बंडू घोडके, उपतालुका प्रमुख संजय घोडके, युवासेना तालुका उपअधिकारी प्रणीत पवार यांनी आज पंढरपूर तालुक्यातील खर्डी,तपकीर शेटफळ, कासेगाव आदी ठीकाणचा गावभेट दौरा करून शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधत पक्ष संघटना,शाखा नूतनीकरण तसेच जिल्हापरिषद पंचायत समिती निवडणुकी बाबत विचार विनिमय व चर्चा केली व पुढील रूपरेषा ठरवण्यात आली.

दौऱ्याची सुरूवात खर्डी येथे श्री सीताराम महाराजांचे दर्शन घेऊन करण्यात आली.खर्डी,तपकीर शेटफळ,कासेगाव आदी प्रमुख गावांचा दौरा करून त्या गावातील शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भुमिका व पुढील रूपरेषा शिवसैनिकांना सांगण्यात आली.

या गावभेट दौऱ्यात अनिल रोंगे,अजिंक्य चंदनशिवे,जयराम चव्हाण,श्रीधर माने, मिलिंद चंदनशिवे,माउली मासाळ, बाळासाहेब खांडेकर,सत्यवान मासाळ, ज्ञानेश्वर शिंगाडे,किसन पाटील,जितेंद्र सुरवसे, ज्ञानेश्वर मांढेकर, मोहन बनसोडे, अरूण चौगुले,बाळासाहेब कदम,बाळासाहेब बोंगे,बापू मोरे आदि शिवसैनिक व पदाधिकारी,शाखाप्रमुख,गट प्रमुख, विभाग प्रमुख आदी उपस्थित होते.
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
