प्रहार च्या लढ्याला यश,घरकुलासाठी पाच ब्रास वाळु मिळणार मोफत
झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाला आली जाग -समाधान हेंबाडे
मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज – मंगळवेढा तालुक्यातील उचेठाण बठाण येथील वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणात चालू होता पण घरकुलासाठी वाळू मिळत नव्हती त्यामुळे प्रहार संघटनेने एक मे रोजी प्रांत कार्यालयासमोर आसूड आंदोलन सुरू केले. सात दिवस आंदोलन चालले परंतु अधिकारी मात्र झोपेचे सोंग घेत होते. प्रहार संघटनेने आठ मे ला गाढव मोर्चा काढणार असे जाहीर करताच या प्रशासनाला जाग आली आणि पंचायत समिती व नगरपालिका यांना लगेच पत्र व्यवहार केला,याद्या मागण्यास सुरुवात केली त्यामुळे प्रहार संघटनेचा जो लढा सुरू होता तो गरिबांच्या घरासाठी हक्काची वाळू द्या.

वाळूसाठी शासन प्रहार पुढे नमले परंतु प्रत्येक घरकुल लाभार्थ्यांनी आपल्या ग्रामपंचायतमध्ये चौकशी करून पाठपुरावा करावा कारण हे शासन मड्यावरचे लोणी खाणारे आहे.काही लाभार्थ्यांना लाभ देईल आणि पुन्हा शांत बसेल पण प्रत्येकाने पाठपुरावा करावा अशी प्रहार कडून सांगण्यात आले आहे.
या आंदोलनात प्रहार चे सिदराया माळी, नवीद पठाण, समाधान हेंबाडे,राकेश पाटील, रोहिदास कांबळे,पिंटू कोळेकर, सचिन सरवदे,तानाजी पवार,देवदत्त पवार,युवराज टेकाळे, सुधीर हजारे, शशिकांत पवार, सर्जेराव पाराध्ये,अनिल दोडमिसे,महिला तालुकाध्यक्ष रुक्मिणी कोकरे ,शालन काळे, जयश्री कोळी व इतर प्रहार सैनिक उपस्थित होते.हे आंदोलन प्रहार चे सोलापूर जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के पाटील व महिला जिल्हाध्यक्ष अपंग क्रांतीचे संजीवनी बारुंगुळे व जिल्हा सरचिटणीस श्रीपाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होते.
आंदोलन स्थळी उपविभागीय अधिकारी बी आर माळी यांनी लेखी उत्तर देऊन हे आंदोलन माघार घेण्यास विनंती केली. यावेळी नायब तहसीलदार श्री.जाधव व श्री. चांडोले ,लिपिक श्री.सुतार उपस्थित होते.
या उचेठाण बठाण वाळू ठेक्याचा पाठपुरावा यापुढेही प्रहार करेल तिथे वाळूचा कसा काळाबाजार चाललेला हे प्रहार लवकरच उघड करेल असे तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे यांनी सांगितले.
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
