वृत्तपत्र संघटनेचे सदस्यांची संख्या वाढवा–शिवलिंग मेढेकर

पंढरपूर शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेची बैठक संपन्न

वृत्तपत्र संघटनेचे सदस्यांची संख्या वाढवा– शिवलिंग मेढेकर

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.५/०५/२०२५- पंढरपूर शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे पंढरपूर येथे वृत्तपत्र विक्रेत्यांची बैठक तेंडुलकर हॉल येथे घेण्यात आली.

ही बैठक प्रमुख पाहुणे शिवलिंग आप्पा मेढेकर अध्यक्ष सोलापूर जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटना व सचिन बाबर नूतन अध्यक्ष बार्शी शहर वृत्तपत्र विक्रेता संघटना तर अध्यक्ष म्हणून महेश पटवर्धन अध्यक्ष पंढरपूर शहर वृत्तपत्र विक्रेता संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. त्यावेळी सभासद नोंदणीचे नूतनीकरण व महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेची संलग्नता फी जमा करणे,व्यवसाय बंद केलेले सभासद संघटनेतून वगळणे,सोलापूर जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या कार्यकारणीत बदल करणे,सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी विक्रेत्यांचा भेदभाव न करता 30 टक्के कमिशन देणे व सात रुपये आधारभूत किंमत धरून त्याच्यावरती 30% कमिशन देणे, जिल्ह्यातील सभासद नसलेले विक्रेते त्यांना सभासद करून घेणे, मागील महिन्यात सोलापूर येथील विश्रामगृहावर झालेल्या सर्व व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीतील आज पाच मे रोजी होणाऱ्या निर्णयावरती चर्चा करण्यात आली.वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कल्याणकारी मंडळाबद्दल ही चर्चा करण्यात आली.

त्यात महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेते यांचे सभासद असल्या शिवाय कल्याणकारी मंडळाचे फायदे मिळणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आले.त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे माजी कोषाध्यक्ष गोरख अर्जुन भिलारे,महेश पटवर्धन व शिवलिंग आप्पा मेढेकर जिल्हाध्यक्ष सचिन बाबर अध्यक्ष बार्शी यांनी मागील महिन्यात मुंबई येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेतेच्या संघटनेच्या बैठकीतील विषयावरती चर्चा केली तसेच आपल्या मोबाईल मध्ये सर्वांनी VVS Maharashtra हे ॲप डाऊनलोड करून आपली सभासद नोंदणी करावी यासाठी मार्गदर्शन केले. या बैठकीस पंढरपूर शहर वृत्तपत्र विक्रेते मोठ्या संख्येने हजर होते.

आभार प्रदर्शन नंदकुमार देशपांडे उपाध्यक्ष सोलापूर जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटना यांनी केले.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading