महात्मा बसवेश्वर महाराज जयंती कासेगाव मध्ये उत्साहात साजरी

महात्मा बसवेश्वर महाराज जयंती कासेगाव मध्ये उत्साहात साजरी

कासेगांव/शुभम लिगाडे / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३० एप्रिल २०२५- महात्मा बसवेश्वर महाराज जयंती कासेगाव ता.पंढरपूर येथे उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन व आरती मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर लिंगायत समाजबांधवांच्यावतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आला.

महात्मा बसवेश्वर महाराज हे 12 व्या शतकात आध्यात्मिक, वैचारिक,सामाजिक परिवर्तन घडवून आणणारे एक महान परिवर्तनवादी युगपुरुष होते.त्यांनी अनिष्ट प्रथा,रूढी, परंपरा, जातीयता,अंधश्रद्धा,कर्मकांड यांचा विमोड करून सामाजिक व्यवस्था उभी करण्याचे उल्लेखनीय कार्य केले.

आज भारतासह जगभरात लोकशाही अनुभवतो त्या लोकशाही व्यवस्थेचा पाया बाराव्या शतकात अनुभव मंटपाच्या माध्यमातून घातला होता.

या कार्यक्रमासाठी महालिंग लिगाडे, रेवणसिद्ध साखरे,मोहन खताडे,शशिकांत साखरे,अक्षय साठे,मधुकर साखरे,म्हमाजी साखरे,प्रतिक खराडे,नवनाथ साखरे,सागर लिगाडे,विरेंद्र शेंडे,ओंकार खराडे,उमेश गोटे, आकाश लिगाडे,निखिल कळकुंबे,गणेश भागानगरे आदींसह लिंगायत समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading