महाराष्ट्र वीरशैव सभा संघटनेच्यावतीने जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन

महाराष्ट्र वीरशैव सभा संघटनेच्यावतीने जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज- महाराष्ट्र वीरशैव सभा संघटनेच्या वतीने पंढरपूर शहरामध्ये सोलापूर जिल्हाध्यक्ष ॲड.राज भादुले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आद्य समाजसुधारक, समतानायक, जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी महाराष्ट्र वीरशैव सभेचे शहराध्यक्ष विशाल आर्वे, तालुकाध्यक्ष धनंजय मेनकुदळे,मर्चंट बँकेचे संचालक भगीरथ म्हमाणे,अमरजीत पाटील, शाम गोगाव सर, मा.नगरसेवक निलराज डोंबे,मन्मथ स्वामी मठ कार्यकारी मंडळ अध्यक्ष युवराज डोंबे, महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष राजकुमार जेठे सर, युवराज मुचलंबे, बसवराज मरळे,आनंद मेनकुदळे,सुरज पावले आदी मान्यवर व समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर ॲड. राज भादुले व अमरजीत पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना महात्मा बसवेश्वर यांच्या कार्याला उजाळा दिला.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading