द.ह.कवठेकर प्रशालेत शिक्षण सप्ताहाचे आयोजन

प्रशालेतील मराठी,हिंदी, संस्कृत, इंग्रजी, इतिहास, भूगोल, गणित,विज्ञान विषय शिक्षकांनी आपल्या अध्यापनात शैक्षणिक साधनांचा परिपूर्ण वापर करून आजचा उपक्रम केला संपन्न

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२/०७/२०२४- पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या द.ह. कवठेकर प्रशालेत आज शासकीय आदेशानुसार शिक्षण सप्ताह उपक्रम साजरा करण्यास प्रारंभ झाला.

आजच्या या उपक्रमात शालेय अभ्यासक्रमातील शैक्षणिक साधनांचे महत्त्व हा विषय प्रशालेचे उपमुख्याध्यापक एन.बी. बडवे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळ सत्रचे ज्येष्ठ शिक्षक डी.बी.पाटोळे सर,श्री वेळापूरे सर व सौ.विष्णू मॅडम, सौ. गायकवाड मॅडम, दुपार सत्र ज्येष्ठ शिक्षक आर.एस. कुलकर्णी सर,संतोष पाटोळे सर,सौ.एस.एस.कुलकर्णी मॅडम, सौ.भक्ती रत्नपारखी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रशालेतील मराठी,हिंदी, संस्कृत, इंग्रजी, इतिहास, भूगोल,गणित,विज्ञान या विषय शिक्षकांनी आपल्या अध्यापनात शैक्षणिक साधनांचा परिपूर्ण वापर करून आजचा उपक्रम संपन्न केला.

यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही.एम. कुलकर्णी सर यांचे मार्गदर्शन लाभले.या उपक्रमात प्रशालेचे विषय शिक्षक व विद्यार्थी सहभागी होते.

Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
