प्रतिष्ठानमार्फत वृक्षारोपण आणि संवर्धन कुणाकडूनही कुठल्याही प्रकारचे पैसे किंवा अनुदान न घेता
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७/०७/२०२४- महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, ता.अलिबाग, जि.रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण व संवर्धन कार्यक्रम पार पडला.
पंढरपूर येथे दि.०७/०७/२०२४ रविवार रोजी महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, ता.अलिबाग,जि. रायगड प्रतिष्ठान मार्फत पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिन दादा धर्माधिकारी यांचे मार्गदर्शना नुसार पंढरपूर शहर व परिसरात ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.यात रेल्वे मैदान पंढरपूर : ८० वृक्ष , पंत चौक वाखरी ते बायपास रोड : ८०० वृक्ष,
वाहनतळ इसबावी : ११० वृक्ष अशी एकूण ९९० वृक्ष लागवड करण्यात आली.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याधिकारी पंढरपूर नगरपालिका डॉ प्रशांत जाधव,रेल्वे अभियंता राहुल तांदळे, पंढरपूर नगरपरिषद उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर, उपअभियंता बांधकाम विभाग भिमाशंकर मेटकरी आदी उपस्थित होते. यावेळी २१०० श्री सदस्यांनी सहभाग घेतला.
या प्रतिष्ठानमार्फत होणारे वृक्षारोपण आणि संवर्धन हे कुणाकडूनही कुठल्याही प्रकारचे पैसे किंवा अनुदान न घेता केले जाते आणि वृक्षारोपण केलेले रोप किमान चार ते पाच वर्षापर्यंत मोठे होईपर्यंत त्यांचं संवर्धन करण्याचं काम या प्रतिष्ठानमार्फत श्री सदस्य करत असतात हे विशेष उल्लेखनीय बाब आहे.
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
