IND W vs SA W: भारताने दक्षिणआफ्रिकेला पराभूत करून 15 धावांनी सामना जिंकला

[ad_1]

Indian womens cricket team

Twitter

श्रीलंकेवर नऊ विकेट्सनी विजय मिळवल्यानंतर, भारतीय महिला संघाने त्रिकोणी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 15 धावांनी पराभव केला. मंगळवारी कोलंबोमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात, प्रतिका रावलच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने 50 षटकांत सहा गडी गमावून 276धावा केल्या.

ALSO READ: आयसीसी स्पर्धेतही भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार नाही!
प्रत्युत्तरात, दक्षिण आफ्रिकेचा संघ 49.2 षटकांत 261 धावांवर आटोपला. त्यांच्याकडून ताजमिन ब्रिट्सने सर्वाधिक 109 धावा केल्या. स्नेहा राणाने पाच तर अरुंधती रेड्डी, श्री चरणी आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी एक विकेट घेतली.

 

लक्ष्याचा पाठलाग करताना, दक्षिण आफ्रिकेने लॉरा वोल्वार्ड आणि टॅझमिन ब्रिट्सच्या मदतीने चांगली सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी दोघांमध्ये 140 धावांची मोठी भागीदारी झाली. लॉरा ४३ धावा करून बाद झाली. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. 

ALSO READ: बीसीसीआयने सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट जाहीर केला,टीम इंडियाच्या खेळाडूंची लागली लॉटरी

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रतीका रावल आणि स्मृती मानधना यांनी चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी दोघांमध्ये83 धावांची भागीदारी झाली.

ALSO READ: पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
पाच चौकारांसह 36 धावा काढून मंधाना बाद झाली. यानंतर, रावलला हरलीन देओलचा पाठिंबा मिळाला. दोघांनीही 73चेंडूत 68 धावा जोडल्या. लाबाने सलामीवीर प्रतिकाला बाद केले. 91चेंडूत 78 धावा करून ती बाद झाली. त्याने सलग पाचव्या डावात 50 पेक्षा जास्त धावा केल्या. तर, हरलीनने 29 धावा केल्या. तिच्याशिवाय जेमिमा रॉड्रिग्जने 41, रिचा घोषने 24 आणि दीप्ती शर्माने नऊ धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौर 41आणि काशवी गौतम पाच धावांवर नाबाद राहिली. दक्षिण आफ्रिकेतर्फे लाबाने 2 तर अयाबोंगा, क्लास, नादिन डी क्लार्क आणि ॲनेरी डर्कसेन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. 

Edited By – Priya Dixit  

 

[ad_2]

Source link


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading