महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमीत्त पंढरपूर येथील वीरशैव लिंगायत स्मशानभूमी येथे स्वच्छता अभियान
पंढरपूर/शुभम लिगाडे,दि.२८ एप्रिल २०२५ – महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमीत्त पंढरपूर येथील वीरशैव लिंगायत स्मशानभूमी येथे स्वच्छता अभियान करण्यात आले.

ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाचे काहीतरी देणं लागतो ही भावना मनात ठेऊन खर्या अर्थाने महात्मा बसवेश्वर महाराजांना अभिप्रेत असलेली जयंती साजरी करत आहोत.असा आगळावेगळा उपक्रम सर्वं समाजबांधवांनी राबविला पाहिजे अशी भावना वीरशैव लिंगायत समाजातील युवकांनी व्यक्त केली.

वीरशैव लिंगायत स्मशानभूमी स्वच्छता अभियानास माजी नगरसेवक निलराज डोंबे,युवराज मुचलंबे,श्रीनिवास बोरगांवकर, प्रशांत मेनकुदळे,अमोल मेनकुदळे,गंगाधर स्वामी, सागर स्वामी,अतुल मेनकुदळे,विशाल आर्वे सर आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने या कार्यासाठी उपस्थित होते.

Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
