स्मार्ट सिटी बरोबरच स्मार्ट गावेही झाली पाहिजेत – खासदार प्रणिती शिंदे

स्मार्ट सिटी बरोबरच स्मार्ट गावेही झाली पाहिजेत…
आळगे गावभेट दौऱ्यात खासदार प्रणिती शिंदे यांचे प्रतिपादन

या आळगे गावभेट दौऱ्यात प्रथम पहलगाम अतिरेकी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शहिदांना श्रद्धांजली

सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७ एप्रिल २०२५ – सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आज अक्कलकोट तालुक्यातील आळगे या गावी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधून तुम्ही मला खासदार म्हणून निवडून देऊन सेवेची संधी दिली त्याबद्दल आभारी आहे असे सांगत स्मार्ट सिटी बरोबरच स्मार्ट गावे झाले पाहिजेत यासाठी आपला प्रयत्न राहील. आळगे गावाच्या मैदान, रस्ते, रेशन धान्याची समस्या, अपंगांचे प्रश्न आदी मूलभूत सोयीसुविधांचे प्रश्न सोडविण्याची, आणि आळगे गावाचा आणि अक्कलकोट तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी दिली.

तसेच ग्रामस्थांचे निवेदने ही स्वीकारून त्यांच्या अडचणी लवकरात लवकर सोडविणार असल्याचे सांगितले.

यावेळी ऊबाठा शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष महांतेश हत्तुरे, सरपंच सुगलाबाई हत्तुरे, ऊबाठा शिवसेना तालुकाध्यक्ष आनंद बुक्कानुरे, महादेव पाटील, बसवराज पाटील, उमेश क्याता, निजाम कुमठे, यासीन कुमठे, वन्नप्पा कोळी, सिद्धाराम कोळी, रियाज मुल्ला, अरविंद कुलकर्णी, शरणबसप्पा माळगे, मलकारी पुजारी, रुकुमोद्दीन कुमठे, वजीर बाशा कुमठे, धर्मराज मांग यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला व तरुण बहुसंख्येने उपस्थित होते.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading