फक्त पुरूषांवर हल्ले झाले, महिलांना सोडण्यात आले', शरद पवारांचे केंद्र सरकारवर प्रश्न

[ad_1]


जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देश हादरला आहे. या हल्ल्यात फक्त पुरूषांना लक्ष्य करण्यात आले, ज्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारकडून उत्तर मागितले आहे आणि सुरक्षा व्यवस्थेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

ALSO READ: पहलगाम हल्ल्यानंतर शिंदे-फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये

 ते म्हणाले की, अशा गंभीर बाबींमध्ये राजकारण नसावे, परंतु जबाबदारी आवश्यक आहे. देशाची सुरक्षा सर्वात आधी येते आणि अशा घटनांना गांभीर्याने घेतले पाहिजे, असे पवार म्हणाले. त्यांनी असेही म्हटले की, संपूर्ण देशाने या मुद्द्यावर सरकारला एकत्र येऊन पाठिंबा द्यावा, परंतु सरकारलाही त्यांची जबाबदारी समजून घ्यावी लागेल.

ALSO READ: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर प्रियंका चतुर्वेदी संतापल्या, सरकारकडे या 3 मागण्या केल्या

दहशतवाद आता संपला आहे” या सरकारने केलेल्या विधानांवर शरद पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की जर हे घडले असते तर ते खूप आनंदाची गोष्ट असती, परंतु अलीकडील घटनेवरून असे दिसून येते की सुरक्षा व्यवस्थेत अजूनही अनेक त्रुटी आहेत. जर सरकारने या कमतरता स्वीकारल्या आणि त्यावर त्वरित कारवाई केली तर विरोधी पक्षही सहकार्य करण्यास तयार आहे, असे ते म्हणाले. सरकारने या मुद्द्यावर पूर्ण गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, असेही पवार म्हणाले.

ALSO READ: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर कोकण किनाऱ्यावर सुरक्षा वाढवण्यात आली
माजी संरक्षण मंत्री शरद पवार म्हणाले की, ही स्पष्टपणे गुप्तचर यंत्रणेची चूक आहे. ते म्हणाले की पहलगाम हा नेहमीच सुरक्षित क्षेत्र मानला जातो आणि अशी घटना होणे ही अत्यंत चिंतेची बाब आहे. पवार म्हणाले की, जर दहशतवाद्यांनी बनवलेला प्लॅन यशस्वी झाला असेल तर तो आणखी भीतीचा विषय आहे. त्यांनी सांगितले की, तिथे उपस्थित असलेल्या लोकांच्या मते, हल्लेखोरांनी फक्त पुरुषांना लक्ष्य केले आणि महिलांना काहीही केले नाही. पवार म्हणाले की, या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, कारण ही खूप गंभीर बाब असू शकते.केंद्र सरकार ने या कडे विशेष लक्ष दिले पाहिजे.

Edited By – Priya Dixit

 

[ad_2]

Source link


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading