इंद्रप्रस्थ वाहनतळावरील सुशोभिकरणास स्थानिक दुकानदारांचा विरोध

इंद्रप्रस्थ वाहनतळावरील सुशोभिकरणास स्थानिक दुकानदारांचा विरोध

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७/०७/२०२४ – येथील नगरपरिषदेच्या इंद्रप्रस्थ शॉपिंग सेंटरच्या वाहनतळावर शहर सुशोभिकरण अंतर्गत तुळशी वृंदावन व संतांच्या मूर्ती उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यास येथील दुकानदारांनी विरोध दर्शविला आहे. याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील व आमदार समाधान आवताडे यांना निवेदन देण्यात आले.

पंढरपूर नगरपरिषदेचे शहरातील पहिले शॉपिंग सेंटर म्हणून इंद्रप्रस्थची ओळख आहे. चाळीस वर्षाहून जुन्या असणाऱ्या या शॉपिंग सेंटरमधील दुकानदारांसाठी व येणाऱ्या ग्राहकांसाठी वीर सावरकर पुतळ्याच्या पिछाडीस वाहनतळ देखील आहे. मात्र सदर जागेवर उंच तुळशी वृंदावन, संतांचे पुतळे उभा करण्याचा अचानक निर्णय प्रशासनाने घेतला. विशेष म्हणजे यास तातडीने मंजुरी देखील देण्यात आली आहे.

यामुळे येथील दुकानदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सदर सुशोभिकरण दुकानांच्या समोरच येणार असल्याने रस्त्यावरून दुकाने दिसणार नाहीत व याचा मोठा आर्थिक फटका व्यापाऱ्यांना बसू शकतो. तसेच वाहनतळाची जागा कमी होणार आहे. यामुळे येथील गाळाधारकांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील तसेच आमदार समाधान आवताडे यांची भेट घेऊन त्यांना सदर सुशोभिकरण करण्यास विरोध दर्शविला.याबाबत त्यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.

वास्तविक कोणत्याही ठिकाणी काम करत असताना त्या ठिकाणच्या नागरिकांना विश्वासात घेऊन पुढील पाऊल उचलले जाणे गरजेचे असते मात्र या गोष्टी घडत नाहीत आणि गैरसमजातून प्रश्न जटील बनत जातो त्यामुळे कोणतीही गडबड न करता सर्वांशी चर्चा करून निर्णय घ्यावा अशी मागणी केली जात आहे.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading