व्याख्याते गणेश शिंदे यांचे जीवन सुंदर आहे विषयावर प्रेरणादायी व्याख्यान

माऊली फाऊंडेशन मुंबई,आषाढीवारी सोहळा मॅग आणि माऊली फाऊंडेशन संचालित जनसेवा वाचनालय आयोजित गणेश शिंदे यांचे जीवन सुंदर आहे या विषयावर व्याख्यान

मुंबई/ ज्ञानप्रवाह न्यूज –माऊली फाऊंडेशन मुंबई आणि आषाढीवारी सोहळा मॅग आणि माऊली फाऊंडेशन संचालित जनसेवा वाचनालय आयोजित महाराष्ट्रातील तरुणांना अभ्यासू आणि तडफदार वक्ते म्हणून परिचित असणारे तसेच झी टॉकीजवरील गजर कीर्तनाच्या कार्यक्रमातील सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांचे जीवन सुंदर आहे या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान सोमवार दि.०८/०७/२०२४ रोजी सायंकाळी ६.०० ते ८.०० या वेळेत अनंत मंगल कार्यालय फलटण जि.सातारा येथे आयोजित करण्यात आले आहे.

तरी सर्वांनी उपस्थित राहून या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन मॅग आणि माऊली फाऊंडेशन संचालित जनसेवा वाचनालय यांनी केले आहे. हे दोन तास तुमच्या आयुष्याचा दृष्टीकोन बदलून टाकतील असा विश्वास मॅग आणि माऊली फाऊंडेशन संचालित जनसेवा वाचनालय यांच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading