पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने चंद्रभागा वाळवंटात विशेष स्वच्छता मोहीम

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३०/०६/२०२४- शहरामध्ये दि. १७ जुलै २०२४ रोजी आषाढी यात्रा भरत असून या आषाढी यात्रेसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूर मध्ये येत असतात नगरपरिषदेने शहरातील विविध कामे हाती घेतली आहेत.

त्यामध्ये लाखो भाविक चंद्रभागाचे स्नानासाठी येत असतात चंद्रभागेच्या स्नानानंतर श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतात. या पार्श्वभूमीवर दगडी पूल बंधारा ते चंद्रभागा घाटापर्यंत वाळवंटातील विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली असून नदीपात्रा लगत असलेले सर्व घाट व वाळवंट परिसर ७५ कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वच्छ करण्यात आला आहे.

तसेच वाळवंटामध्ये आठ हाय मास्ट ची दुरुस्ती यात्रेपूर्वी करण्यात आली आहे.वाळवंटालगत असलेल्या घाटावरचे फ्लड लाईट सुद्धा बसवण्याचे काम चालू आहे.यात्रा कालावधी पूर्ण होईपर्यंत नदीच्या पात्रातील स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न नगर परिषद करणार असल्याची माहिती पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव यांनी दिली
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
