देशातील मंदिर परंपरा पुनरुज्जीवित करण्याचे आव्हान संगीत नाटक अकादमीने स्वीकारले
पंढरपूरात कला अकादमीचा कलाप्रवाह उत्सव
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/०६/२०२४- संगीत नाटक अकादमी, नवी दिल्ली यांच्या वतीने संत तुकाराम महाराज भवन, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, पंढरपूर येथे दि.23 व 24 जून रोजी कला प्रवाह उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंदिर परंपरा नेहमीच भारताच्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक परंपरेचा एक भाग राहिल्या आहेत आणि प्राचीन काळापासून देशातील विविध मंदिरांमध्ये असे उत्सव श्रद्धेने आणि उत्साहाने आयोजित केले जातात. संगीत नाटक अकादमीने अनुभवले आहे की कालांतराने या मंदिर परंपरा हळूहळू कमकुवत झाल्या आणि त्यांचे सांस्कृतिक महत्त्व आणि ओळख यापासून दूर गेल्या आणि त्यामुळे आज त्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अशा परिस्थितीत देशातील मंदिर परंपरा पुनरुज्जीवित करण्याचे आव्हान संगीत नाटक अकादमीने स्वीकारले आहे. मंदिर परंपरा पुनरुज्जीवित करण्याचे हे पवित्र कार्य अयोध्या ,काशी विश्वनाथ, महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर, ज्वालामुखी मंदिर कांगडा येथून सुरू झाला.
दरम्यान सदर कार्यक्रम जिल्हा प्रशासन, सोलापूर आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती महाराष्ट्राच्या सहकार्याने करण्यात येत आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन डॉ. संध्या पुरेचा, अकादमीच्या अध्यक्षा, आमदार समाधान आवताडे, ह.भ.प.न्यायमूर्ती मदन महाराज गोसावी, माजी आमदार प्रशांत परिचारक, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, चंदाताई तिवाडी आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे.
सदर कार्यक्रम सायंकाळी 6 वा.असून या दोन दिवसात विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
