गडकिल्ल्यांवर गैरवर्तन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही – पोलिस अधिक्षक पंकज देशमुख

गडकिल्ल्यांवर गैरवर्तन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही -पोलिस अधिक्षक पंकज देशमुख

गैरवर्तन करण्यास कोणीही धजावणार नाही अशा उपाययोजना करणार असल्याची ग्वाही दिली

पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज : पुणे जिल्ह्यातील गडकिल्ल्यांना भेट देणार्या पर्यटकांशी गैरवर्तन करणार्या अपप्रवृत्तीला रोखण्या बाबतचे निवेदन राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेश गडकिल्ले संवर्धन सेल चे प्रदेशाध्यक्ष योगेश शेलार यांनी पुणे ग्रामिण चे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांना दिले.

किल्ले सिंहगड येथे काही हुल्लडबाज युवकांकडून विदेशी पर्यटकांसोबत गैरवर्तन केल्याची संतापजनक घटना नुकतीच घडली होती.या घटनेबाबत सर्व स्तरातून निषेध व्यक्त झाला होता.याच पार्श्वभूमीवर पुणे ग्रामिणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांची योगेश शेलार यांनी भेट घेवून सविस्तर चर्चा केली.पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या गडकोटांवर पर्यटकांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.गडकोटांची अस्मिता टिकवण्यासाठी व पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तसेच गैरप्रकारांना प्रतिबंधित करण्याठी ठोस उपाययोजना पुणे ग्रामिण पोलिसांकडून व्हावी अशी आग्रही मागणी केली.

त्यावेळी यापुढे गडकिल्ल्यावर येणार्या देश विदेशातील पर्यटकांशी गैरवर्तन करणाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नाही असा थेट इशारा पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी दिला. त्याचवेळी गैरवर्तन करण्यास कोणीही धजावणार नाही अशा उपाययोजना करणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी राष्ट्रवादी गडकिल्ले संवर्धन सेलचे समीर धुमाळ, महेंद्र देवघरे, मनोजकुमार भोसले, कुणाल शेलार हे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना महेंद्र देवघरे यांनी सांगितले अशा हुल्लडबाजांमुळे राज्य आणि देशाचे नाव बदनाम होत असून पर्यटक येताना चार वेळा विचार करतात.याचा परिणाम आर्थिक उलाढालीवर होऊन अनेकांच्या संसाराला हानी पोहचत आहे.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading