काँग्रेसच भाजप आणि आरएसएसला हरवू शकते म्हणाले राहुल गांधी

[ad_1]

Rahul Gandhi
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी गुजरातमधील पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले की, सध्या राज्यात काँग्रेस कमकुवत वाटत असली तरी, भाजप आणि आरएसएसला पराभूत करण्याची ताकद फक्त काँग्रेसकडेच आहे.

ALSO READ: पालकमंत्री अजित पवार यांच्या घोषणेनंतर दोन आठवड्यातच बीड जिल्ह्यात १९१ कोटींची ‘सीआयआयआयटी’ स्थापनेचा निर्णय

मिळालेल्या माहितीनुसार राहुल गांधी आठवड्यात दुसऱ्यांदा गुजरातला भेट देत आहे. त्यांनी अरावली जिल्ह्यातील मोडासा शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांची भेट घेतली आणि त्यांना आगामी निवडणुकांसाठी प्रेरित केले. ते म्हणाले की, गुजरात हे काँग्रेससाठी खूप महत्त्वाचे राज्य आहे, जिथे एकेकाळी पक्षाची मजबूत पकड होती. भाजप गेल्या ३० वर्षांपासून सत्तेत असला तरी, आता काँग्रेसने नवीन उत्साह आणि संघटित रणनीतीसह परतण्याची वेळ आली आहे. तसेच राहुल गांधी म्हणाले की, गुजरातमध्ये संघटना मजबूत करण्यासाठी काँग्रेस पक्ष जिल्हा पातळीवर एक नवीन योजना सुरू करत आहे. या योजनेचा उद्देश बूथ पातळीवर पक्षाला सक्रिय करणे आहे, जेणेकरून कार्यकर्ते थेट जनतेशी जोडले जाऊ शकतील आणि काँग्रेसचा पाया पुन्हा मजबूत होईल. ते असेही म्हणाले, “गुजरात हे काँग्रेस पक्षासाठी सर्वात महत्त्वाचे राज्य आहे. आपण सध्या कमकुवत दिसत असू शकतो, परंतु आपण येथे भाजपला पराभूत करू. हे अशक्य नाही. मी येथे तुम्हाला हे सांगण्यासाठी आलो आहे की आपण ते करू शकतो आणि आपण ते नक्कीच करू.” गुजरातमधील पुढील विधानसभा निवडणुका २०२७ च्या अखेरीस होणार आहे. राहुल गांधींचा हा दौरा पक्षाच्या पुनर्रचनेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

ALSO READ: बेकायदेशीर स्थलांतरितांबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा

Edited By- Dhanashri Naik 

ALSO READ: मंत्री संजय शिरसाट म्हणाले आता रोबोट गटारांची साफसफाई करतील, महाराष्ट्र सरकार १०० रोबोट खरेदी करणार

[ad_2]

Source link


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading