PBKS vs KKR : पंजाब किंग्जने रोमांचक सामन्यात KKR ला 16 धावांनी हरवले

[ad_1]

KKR vs PBKS
फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांच्या शानदार कामगिरीमुळे पंजाब किंग्जने कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) चा 16 धावांनी पराभव केला. या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 15.3 षटकांत 111धावा केल्या.

ALSO READ: अफगाणिस्तानातील विस्थापित महिला क्रिकेटपटूंसाठी टास्क फोर्सची स्थापना ICC चा नवीन उपक्रम
प्रत्युत्तरात, संपूर्ण केकेआर संघ 15.1 षटकांत 95 धावांवर ऑलआउट झाला. पंजाबकडून चहलने चार षटकांत 28 धावा देत चार बळी घेतले, तर वेगवान गोलंदाज मार्को जानसेनने 17धावांत तीन बळी घेतले आणि संघाच्या अभूतपूर्व विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. 

ALSO READ: आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी सौरव गांगुली यांची पुन्हा निवड

अशाप्रकारे, पंजाबने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्येचा बचाव केला आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरला कोणत्याही परिस्थितीत चांगली स्थिती दिसत नव्हती कारण त्यांनी पहिल्याच षटकात विकेट गमावल्या.

ALSO READ: एकदिवसीय सामन्यात दोन चेंडू वापरण्याच्या नियमात आयसीसी बदल करू शकते

केकेआरकडून रघुवंशीने सर्वाधिक 37 धावा केल्या, तर रहाणेने 17 आणि रसेलने17 धावा केल्या. या तीन फलंदाजांव्यतिरिक्त, केकेआरचा कोणताही फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकला नाही, तर त्यांच्या तीन फलंदाजांना त्यांचे खातेही उघडता आले नाही. पंजाबकडून चहलने शानदार कामगिरी केली. या हंगामात त्याला आतापर्यंत काही खास कामगिरी करता आलेली नाही, 

Edited By – Priya Dixit  

 

 

[ad_2]

Source link


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading