आंध्र प्रदेशातील फटाक्याच्या कारखान्यात लागलेल्या आगीत 8 जणांचा मृत्यू

[ad_1]


आंध्र प्रदेशातील अनकापल्ले जिल्ह्यातील कोटावुरुतला मंडळातील कैलासपट्टिनममध्ये एक मोठा अपघात झाला आहे. येथील एका फटाक्याच्या कारखान्यात लागलेल्या आगीमुळे आठ जणांचा मृत्यू झाला आहे. गृहमंत्र्यांनी स्वतः मृतांच्या संख्येची पुष्टी केली आहे.

ALSO READ: जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा सिजफायरचे उल्लंघन, किश्तवाडमध्ये जैश कमांडरसह 3 दहशतवादी ठार

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनीही या अपघातावर निवेदन दिले आहे. त्यांनी सांगितले की, अनकापल्ले जिल्ह्यातील कोटावुरुतला येथील फटाके उत्पादन युनिटमध्ये झालेल्या स्फोटात कामगारांचा मृत्यू दुःखद आहे. घटनेची माहिती गोळा करण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि राज्याच्या गृहमंत्री अनिता यांच्याशी फोनवरून बोलले. 

ALSO READ: 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, चार अल्पवयीन मुलांसह 8 जणांना अटक

जखमींना चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यांनी आश्वासन दिले की सरकार पीडितांच्या कुटुंबांना पाठिंबा देईल आणि त्यांना खंबीर राहण्याचे आवाहन केले. 

 

मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आणि अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. जखमी कामगारांपैकी दोन कामगारांची प्रकृती गंभीर असल्याचे अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. आंध्र प्रदेशच्या सीएमओच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे.

ALSO READ: तहव्वुर राणा मुंबईसारख्या इतर शहरांमध्ये हल्ल्यांचा कट रचत असल्याचा एनआयएचा दावा

ही घटना दुपारी 12:45 च्या सुमारास घडली आणि अधिकारी सध्या मृतदेह बाहेर काढण्यावर आणि जखमींना रुग्णालयात हलवण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. स्थानिक लोकही घटनास्थळी पोलिसांना मदत करत आहेत. वायएसआरसीपीचे प्रमुख वायएस जगन मोहन रेड्डी यांनीही दुःख व्यक्त केले आणि सरकारला पीडितांना मदत करण्याचे आवाहन केले. त्यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन केले.

अद्याप स्फोटाचे कारण समजू शकले नाही. पोलीस तपासात गुंतले आहे. 

Edited By – Priya Dixit 

 

[ad_2]

Source link


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading