एमआयडीसी फॉइल कारखान्यातील स्फोटात मृत्युमुखी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने भरपाई आणि नोकरी जाहीर केली

[ad_1]

Chandrashekhar Bawankule
नागपूर जिल्ह्यातील उमरेड एमआयडीसीमधील अॅल्युमिनियम फॉइल उत्पादन कंपनीत शुक्रवारी भीषण आग लागली. या भीषण अपघातात 6 जण जखमी झाले, त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर होती आणि त्यांचा मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्यातील अॅल्युमिनियम उत्पादने बनवणाऱ्या कारखान्यात झालेल्या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या दोन कामगारांचा शनिवारी मृत्यू झाल्याने मृतांची संख्या पाच झाली.

ALSO READ: जळगाव जिल्ह्यातील 5 रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार, केंद्र सरकारने दिली मंजुरी

इतर पाच जखमींवर उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. नागपूर जिल्ह्यातील उमरेड एमआयडीसीमधील एमएमपी अॅल्युमिनियम इंडस्ट्रीजमध्ये शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता स्फोट झाला. “नागपूरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल झालेल्या दोन गंभीर जखमी कामगारांचा शनिवारी पहाटे मृत्यू झाला, तर आग विझवल्यानंतर कंपनीत तीन कामगार मृतावस्थेत आढळले,” असे एका पोलिस निरीक्षकाने सांगितले. मृत कामगार 20 ते 25 वयोगटातील होते आणि ते नागपूर जिल्ह्यातील रहिवासी होते

ALSO READ: नागपूरच्या उमरेड एमआयडीसीच्या अॅल्युमिनियम कारखान्यात भीषण स्फोट, 5 जणांचा मृत्यू

उमरेडमधील या घटनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घटनेचा आढावा घेतला. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मृतांच्या कुटुंबियांना भरपाई जाहीर केली. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र सरकार मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देईल.आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याची घोषणा केली आहे.एमएमटी इंडस्ट्रीज लिमिटेड नावाच्या कंपनीने मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 55 लाख रुपये आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरी आणि जखमींना प्रत्येकी 30 लाख रुपये आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याची घोषणा केली आहे.

ALSO READ: मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले मुंबई पोलीस एनआयएला पूर्ण सहकार्य करतील
अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील उमरेड एमआयडीसी (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) येथील एमएमटी इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा आग लागली. नागपूर ग्रामीण पोलिस अधीक्षक (एसपी) हर्ष पोद्दार यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात उपचार सुरू असताना दोघांचा मृत्यू झाला, तर बेपत्ता असलेल्या तीन जणांचाही मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे.

Edited By – Priya Dixit 

 

[ad_2]

Source link


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading