धुळ्यात प्रथमच एक दिवसीय नॅशनल सायबर कॉन्फरन्सचे आयोजन

धुळ्यात प्रथमच एकदिवसीय नॅशनल सायबर कॉन्फरन्सचे आयोजन

धुळे /ज्ञानप्रवाह न्यूज – सध्याच्या आधुनिक काळात आपण सर्व जण एकमेकांशी इंटरनेटच्या माध्यमातून जोडले गेलेले आहोत.याचाच फायदा सायबर गुन्हेगार घेत आहेत. त्यामुळे सर्वांनी आपली स्वत:ची सायबर सुरक्षा करणे अत्यंत आवश्यक आहे. याची दखल घेत सायबर तज्ञ ॲड.चैतन्य भंडारी यांनी धुळे शहरात एस.व्ही.के.एम. कॉलेज येथे दि.१२ एप्रिल २०२५ रोजी एकदिवसीय नॅशनल सायबर कॉन्फरन्स १.० मिशन सायबर गुन्हेगारीमुक्त खान्देशचे आयोजन केले आहे.

या कॉन्फरन्समध्ये जगभरातील विविध सायबर तज्ञांचा सहभाग असणार आहे. यात प्रसिध्द सायबर तज्ञ ॲड.डॉ. प्रशांत माळी व डॉ.रक्षित टंडन यांचे देखील मार्गदर्शन सर्वसामान्य जनतेस लाभणार असून त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरणार आहे.

या एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेत सायबर सुरक्षिततेबाबत व वाढत्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स या सर्व विषयांबाबत जाणून घेण्याची संधी सर्वसामान्य जनतेला मिळणार आहे.या राष्ट्रीय परिषदेत सायबर अवेरनेस फौंडेशन यांच्यातर्फे सायबर क्षेत्रात महत्वाची कामगिरी करणा-या व या क्षेत्रात विशिष्ट योगदान देणा-या व्यक्तींना डिजीटल हिरो ॲर्वार्ड २०२५ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.तरी सर्वानी या राष्ट्रीय परिषदेत उपस्थित राहून सायबर तज्ञांकडून सायबर सुरक्षिततेविषयी मोलाचे मार्गदर्शन घ्यावे असे आवाहन सायबर अवेरनेस फौंडेशन व सायबर क्लोक डिजीटल लिगल सर्व्हिसेसचे अध्यक्ष ॲड.चैतन्य भंडारी यांनी केले असून अधिक माहितीसाठी मो.नं. ७७७४९७७७७९, ८४१२९७५७४१ या क्रमांकावर संपर्क करावा असे सांगितले.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading