पहिल्या फेरीत पराभव पत्करून पीव्ही सिंधू बाहेर

[ad_1]

pivi sindhu
दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेती आणि माजी विश्वविजेती पीव्ही सिंधू बुधवारी स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्या फेरीत बाहेर पडली. सिंधूची खराब कामगिरी या वर्षीही सुरूच आहे. जागतिक क्रमवारीत 17 व्या स्थानावर असलेल्या सिंधूला 61 मिनिटे चाललेल्या सामन्यात जागतिक क्रमवारीत 31 व्या स्थानावर असलेल्या ज्युली जेकबसेनकडून 21-17, 21-19 असा पराभव पत्करावा लागला.

ALSO READ: भारतीय कुस्ती महासंघाला मोठा दिलासा, क्रीडा मंत्रालयाने निलंबन मागे घेतले
या वर्षी सिंधू सलग तिसऱ्यांदा पहिल्या फेरीत बाहेर पडली आहे. तिने वर्षाची सुरुवात इंडियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचून केली पण इंडोनेशिया मास्टर्स, ऑल इंग्लंड ओपन आणि आता स्विस ओपनमध्ये ती पहिल्या फेरीच्या पुढे प्रगती करू शकली नाही. तिने  2022 मध्ये ही स्पर्धा जिंकली.

ALSO READ: बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या क्वार्टर फायनलमध्ये लक्ष्य सेनचा ली शी फेंगकडून पराभव

पुरुष एकेरीच्या स्पर्धेत किदाम्बी श्रीकांतने पहिल्या फेरीतच आपल्याच देशाच्या एचएस प्रणॉयचा 23-21, २३-21 असा पराभव करून प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. पुरुष एकेरीच्या जागतिक क्रमवारीत 49 व्या स्थानावर घसरलेला श्रीकांत आता अंतिम 16 च्या सामन्यात जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या चीनच्या ली शिफेंगशी सामना करेल.

ALSO READ: लक्ष्य सेनचे जोरदार पुनरागमन, प्रणॉय ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप मधून बाहेर

दरम्यान, जागतिक क्रमवारीत 64 व्या स्थानावर असलेल्या शंकर सुब्रमण्यमने मॅग्नस जोहानसनचा 21-5, 21-16 असा प्रभावी पराभव करून पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. आता त्याचा सामना जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या डेन्मार्कच्या अँडर्स अँटोनसेनशी होईल. 

 

Edited By – Priya Dixit 

 

[ad_2]

Source link


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading