न्यूयॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात बॉम्बची धमकी, विमान मुंबईत परतले

[ad_1]


Mumbai News: महाराष्ट्रातील मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर खळबळ उडाली. घाईघाईत, विमान मुंबईकडे वळवण्यात आले. अशी माहिती समोर आली आहे. 

ALSO READ: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू तर १३ जण जखमी

मिळालेल्या माहितीनुसार मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर खळबळ उडाली. तातडीने, विमान मुंबईकडे वळवण्यात आले. मुंबईहून न्यूयॉर्कला जाणारे एअर इंडियाचे विमान बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला परत मुंबईत आणण्यात आले, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. विमानात ३२० हून अधिक प्रवासी होते आणि ते मुंबईत सुरक्षितपणे उतरले. सुरक्षा यंत्रणा याचा तपास करत आहे.

ALSO READ: 'ट्रम्प यांनी टॅरिफ बाबत दिलेले विधान भारताचा अपमान आहे'-सपा खासदार अवधेश प्रसाद

तसेच आवश्यक प्रोटोकॉलचे पालन केल्यानंतर, विमानातील सर्व लोकांच्या सुरक्षिततेचा विचार करून विमान परत मुंबईत नेण्यात आले. विमानात बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाली होती आणि विमानाच्या शौचालयात यासंबंधीचे एक पत्र सापडल्याचे माहिती समोर आली आहे. एअरलाइनच्या म्हणण्यानुसार, विमान सकाळी १०.२५ वाजता मुंबईत सुरक्षितपणे उतरले. सुरक्षा एजन्सींकडून विमानाची चौकशी केली जात आहे आणि एअर इंडिया अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत आहे, असे निवेदनात म्हटले आहे. ११ मार्च रोजी उड्डाणाची वेळ सकाळी ५ वाजता बदलण्यात आली आहे. सर्व प्रवाशांना हॉटेलमध्ये राहण्याची, जेवणाची आणि इतर मदत देण्यात आल्याचे एअरलाइनने सांगितले.

ALSO READ: बीड : भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी सतीश भोसले यांना गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने मिळाली धमकी

Edited By- Dhanashri Naik 

[ad_2]

Source link


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading