पंढरपुर शहर पोलीस ठाणे तसेच निर्भया पथक यांचे संयुक्त विद्यमाने पोलीस संकुल येथे महिला दिन उत्साहात साजरा
मावळा ॲकेडमी व युनिक ॲकेडमी, रणझुंजार ॲकेडमीतील विद्यार्थिनींचा सत्कार

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०८/०३/२०२५- पोलीस संकुल पंढरपूर येथे महिला दिनाचे औचित्य साधून कार्यक्रम आयोजित केला होता. त्याअनुशंगाने या कार्यक्रमात महिलां विषयक नवीन कायद्यांची माहिती देण्यात आली तसेच महिला व विदयार्थिनींना SELF-DEFENSE चे प्रात्यक्षिके दाखवुन स्वतःचा बचाव कसा करावा याबददल माहिती देण्यात आली.
मावळा ॲकेडमी व युनिक ॲकेडमी, रणझुंजार ॲकेडमीतील विद्यार्थिनींचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन दिले.सदर कार्यक्रमाकरीता पंढरपूर शहर व परिसरा तील जवळपास ३०० ते ३५० महिला तसेच महाविद्यालयीन विदयार्थिनींनी सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढविली.

सदरचा कार्यक्रम हा सहा.पोलीस अधिक्षक श्रीमती अंजना कृष्णा यांचे प्रमुख उपस्थितीत व उपविभागीय अधिकारी डॉ. अर्जुन भोसले व वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली पंढरपुर शहर पोलीस ठाणेकडील मपोसई मोनिका खडके पाटील,सुप्रिया रावण, निर्भया पथकाचे सपोनि विभावरी रेळेकर तसेच पंढरपुर शहर पोलीस ठाणेकडील महिला पोलीस अंमलदार यांनी यशस्वी पार पाडला.
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
